धक्कादायक: अभिनेता सुशांतसिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

0

मुंबई:एम.एस.धोनी, पी.के. छिचोरे या चित्रपटात दमदार अभिनयाने अल्पावधीतच नाव कमविणारे अभिनेते सुशांतसिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे वृत्ताने बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त होत आहे. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्याव रील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Copy