धक्कादायक : यावल पालिकेने लॉकडाऊनमध्ये 300 रुपयांचा दंड केला वसुल

0

यावल : नगरपरीषदेद्वारे लॉकडाऊनच्या काळात शासनाचे नियम न पाळणार्‍या नागरीकांकडुन अवघे 300 रुपयांची दंडात्मक कारवाई झाल्याचे आर्श्वयकारक सत्य तहसील कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीसमोर आल्याने यावल नगर परीषद ही किती कार्यतत्पर आहे हे यातुन सिद्ध झाले आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, सध्या संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून याकरीता कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात प्रशासकीय स्तरावर काही नियम व अटीशर्तीचे आदेश काढलेले असतांनाही मात्र यावल नगर परीषदेच्या माध्यमातून या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासकीय यंत्रणेमध्येच समन्वयाचा अभाव दिसून आला.

यावलमध्ये सोशल डिस्टन्सला हरताळ
यावल शहरात तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यावल नगर परीषदेच्या कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊनच्या काळात कोणकोणते व्यवसाय सुरू ठेवावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यावल नगर परीषदेकडून सोशल डिसटेन्स पासुन सर्वच नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी वाढल्याने अखेर तहसीलदार कुंवर यांनी या विषयाबाबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यधिकारी हे प्रामुख्याने गैरहजर राहिल्याचे दिसुन आले. अशा वेळी तहसीलदार यांनी या लॉक डाऊनच्या पन्नास दिवसाच्या काळात बेशिस्त व्यवसायीक, सार्वजनिक ठीकाणी व्यवसायाच्या नांवाखाली गोंधळ करणार्‍या व आदी प्रकारच्या अटीशर्तीचे भंग करणार्‍या नागरीकांवर किती व कशी दंडात्मक कारवाई केली याची विचारणा नगर परिषदच्या प्रातिनिधींना विचारले असता त्यांनी चक्क लॉक डाऊनच्या पन्नास दिवसाच्या कार्यकाळात एकाकडून 200 रुपये आणी दुसर्‍या एका व्यक्तीकडुन 100 रुपये प्रमाणे अशी 300 रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचे प्रकार समोर आले. 60 हजार लोकसंख्येच्या शहरात अनेक दुकाने व व्यावसायीक मंडळी कुठल्याही शासकीय आदेशाला न जुमानता आपले व्यवसाय राजरोसपणे करीत असल्याने शहरातील बुरुज चौक, खरेदी विक्री संघ, मेन रोड, बुरुज चौक ते बोरावल गेटपर्यंत जवळपास सर्व दुकाने व व्यवसाय सुरू असल्याने नागरीकांची मोठी गर्दी या मार्गावर होत असून सोशल डिस्टन्सचा पार फज्जा उडाल्याचे चित्र आहे. यानंतर तहसीलदारांनी संबंधिताना चांगलेच धारेवर धरल्याचे व शासनानी दिलेल्या आदेशाची काटेकोर पालन करण्याच्या सुचना व आदेश दिले.

यांची होती उपस्थिती
या बैठकीस पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नगर परीषदेचे प्रातिनिधी म्हणून वसुली विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड तसेच स्वच्छता विभागाचे प्रमुख शिवानंद कानडे, यावल शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष सलील महाजन, संघाचे सचिन मिस्त्री उपस्थित होते. दरम्यान नगरपरीषदेचे काही कर्मचारी हे दुकानदार व व्यावसायीकांकडून तसेच लोटगाडीवर फळे तसेच भाजीपाला विकणार्‍या विक्रेत्यांकडून कायद्याचा बडगा दाखवत पैसे ओरबाडत असल्याचा आरोप तसेच ओरड होत आहे.

Copy