Private Advt

धक्कदायक ! बँक खात्याची माहिती परस्पर दुसऱ्याच्या मेलवर ; स्टेट बॅंकेतील प्रकार

रक्कम हडप करण्याचा संशय ; कारवाईची मागणी रक्कम हडप करण्याचा संशय ; कारवाईची मागणी

शहादा–
    बँक खात्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीच्या मेल वर पाठवून हॅकर मार्फत बँकेतील रक्कम परस्पर काढण्याचा हेतू असल्याची तक्रार अब्दुल्ला युसुफजी अँड सन्सचे  माद मुस्तानशिर मर्चंट यांनी पोलिसांत केली आहे याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे दरम्यान पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी केली जात आहे
      शहादा येथील व अब्दुल्ला युसुफजी अँड सन्सचे संचालक माद मुस्तानशीर मर्चंट यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की त्यांचे शहादा स्टेट बँकेत खाते आहे त्या खात्याची परस्पर लेखी स्वरूपात संपूर्ण व्यवहाराची माहिती इस्माईल कायमभाई राजा( राज पाईपचे संचालक) व शेख मुस्तफा रायपूरवाला या दोघांनी संगणमत करून काढल्याने माझ्या खात्यातील रक्कम  हडप करण्याचा हेतू असल्याचे  स्पष्टपणे दिसून येते वास्तविक पाहता शहरातील अनेक व्यापाऱ्यांचे स्टेट बँक शाखेत खाते असून बँक अधिकाऱ्यांनी खाते धारकांची खातरजमा न करता अज्ञात व्यक्तीला एका चिट्टी वरून अब्दुल्ला युसुफजी या फर्मचे संचालक माद मुस्तानसीर मर्चंट  यांची बँक खात्याची संपूर्ण माहिती दिली आहे त्यांचे अब्दुल्ला युसुफ अँड सन्स या नावाने कृषी दुकान असून या दुकानातील आर्थिक व्यवहाराचे खाते स्टेट बँक शाखेत खाते आहे त्यांच्या समाजाचे सचिव इस्माईल कायमभाई राजा( राज पाईपचे मालक) यांनी समाजाच्या कार्यालयात  माद  मर्चंट यांना बोलावून सांगितले की तुमचे स्टेट बँक शाखेतील संपूर्ण बँक स्टेटमेंट माझ्याजवळ आहे  त्यामुळे  माझ्या बँक खात्याचे तपशील तुमच्याकडे कसे ? असा प्रश्न मी त्यांना विचारला असता ते म्हणाले की मला शेख मुस्तफा रायपूरवाला यांनी तुमचे बँकेचे स्टेटमेंट मागण्यास सांगितले होते त्यामुळे मी त्यांना तुमचा खाते क्रमांक  व शेख मुस्तफा यांचा ई-मेल आयडी एका कागदावर  त्यांना लिहून  बँकेत दिला होता त्यावरून बँकेने त्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर तुमच्या बँके खात्याचे स्टेटमेंट पाठविले आहे यासंदर्भात मी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की  एका व्यक्तीने चिट्ठी आणून त्यांनी तुमचे नाव सांगून ई-मेल आयडीवर तुमच्या खात्याचे स्टेटमेंट मागितले त्यानुसार आम्ही त्याला तुमच्या खात्याची माहिती ईमेलवर पाठविली सदर चिट्टी वरील हस्ताक्षर व मजकूर इस्माईल कायमभाई राजा यांचे असल्याचे मी ओळखले बँकेने यासंदर्भात चूक झाल्याचे मान्य केले या प्रकारामुळे   माद मर्चंट यांना संबंधित दोन्ही व्यक्तींचा हेतू बाबत संशय आला त्यांनी  व्यक्तिगत खात्याची माहिती मागवून हॅकर मार्फत परस्पर बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचात्यांचा  हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याचे जाणवले  त्यामुळे माझ्या बँक खात्याची परस्पर माहिती मिळविणाऱ्या इस्माईल कायमभाई राजा व शेख मुस्तफा रायपूरवाला या दोघांवर आय टी ऍक्ट  प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पोलिसात केली आहे  पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची कसूनचौकशी केली जात आहे
     दरम्यान ,स्टेट बँक ही सर्वात मोठी बँक असून या बँकेत स्वतःच्या खात्याची माहिती मिळविण्यासाठी तसेच नवीन खाते उघडण्यासाठी किंवा स्वतःच्या खात्यात काही बदल करण्यासंदर्भात बँकेत गेल्यावर बँक अधिकाऱ्यांकडून विविध अटी शर्तींची पूर्तता करण्यास आणि ओळख पुरावा कागदपत्र मागितले जातात असे असताना  बेजबाबदारपणे एका मोठ्या व्यापाऱ्याची बँक खात्याची माहिती एका चिठ्ठीवर परस्पर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाणे म्हणजे बँक प्रशासनाचा बेजबाबदारपणा असून यामुळे बँकेच्या खातेदारकांची विश्वासार्हता टिकून राहील का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे