धक्कदायक प्रकार ! मृतदेह सरळ चादरीत गुंडाळला

जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट चादरीत गुंडाळून दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा येथील एका ४० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने चार दिवसांपूर्वी या खासगी रुग्णालयामध्ये आले होते. ज्यांचा शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह चादरीत गुंडाळून देण्यात आला. मात्र, दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.