‘द बॅटल ऑफ भिमा कोरेगाव’ च्या महाराष्ट्र हेडपदी कामगार नेते जगन सोनवणे यांची नियुक्ती

भुसावळ : ‘द बॅटल ऑफ भिमा कोरेगाव’ च्या महाराष्ट्र हेडपदी कामगार नेते जगन सोनवणे यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली. चित्रपटाचे डायरेक्टर रमेश थेटे साहेब यांनी याबाबतची घोषणा केली. महाराष्ट्रातील सर्व सोशल डिस्ट्रिब्युटर यांच्या महत्वपूर्ण बैठक झाली. थेटे म्हणाले की, कामगार नेते जगन सोनवणे यांची आधी सोशल डिस्ट्रिब्युटर म्हणून निवड केली होती पण त्यांच्यातली कामाची शक्ती व क्षमता बघुन त्याना आता त्यांच्या वर महाराष्ट्राची जबाबदारी मी टाकत आहे आणि आज मला अशी कार्यसम्राट व्यक्ती निवडल्याचा नक्किच आनंद होत आहे.

चित्रपट यशस्वी करून दाखवणार
कामगार नेते जगन सोनवणे म्हणाले की, प्रचंड मेहनत घेवून व तन मन धन अर्पण थेटे यांनी ऐतिहासीक चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता हा चित्रपट यशस्वी करून आम्हाला इतिहास निर्माण करायचा आहे. राज्यव्यापी भिमा कोरेगाव क्रांती मेळावा मे महिन्यात भुसावळ येथे घेणार असून सर्व सहा विभागात विभागीय भीमा कोरेगाव क्रांती मेळावा घेणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.