‘द कपिल शर्मा’ शो लवकरच परत येतोय – पहा टिझर

0

मुंबई : कॉमेडीचा किंग कपिल शर्मा गेल्या काही वर्षांपासून कॉमेडी शो पासून दूर होता. दरम्यान आता तो पून्हा परतणार आहे. कपिलच्या ‘द कपिल शर्मा’ शोचा पहिला टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

हा टिझर कपिलच्या आधीच्या एकूणच प्रमोशनल व्हिडिओपेक्षा खूपच वेगळा आहे. पूर्वी आठवड्यातून एकदा येणारा कपिलचा शो हा कित्येकांसाठी तणाव दूर करणारा होता. हेच टिझरच्या प्रमोशनमधून दाखवण्यात आलं आहे.

‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ हे कपिलचे दोन शो छोट्या पडद्यावर खूपच गाजले. या शोनं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. आता त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.