द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ गेतली. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा झाला.

लोकशाहीच्या ताकदीनं मला इथवर पोहोचवले
ज्याचा जन्म स्वतंत्र भारतात झाला अशी मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. स्वतंत्र भारताच्या नागरिकांसोबतच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला तेजी आणायला हवी. माझा जन्म ओडिशातील एका आदिवासी गावात झाला. परंतु लोकशाहीच्या ताकदीनं मला इथवर पोहोचवलं, असे मुर्मू यावेळी म्हणाल्या. मी माझ्या जीवनाची सुरूवात ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावापासून केली होती. मी ज्या ठिकाणाहून येते त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेणंही एका स्वप्नाप्रमाणे होतं. परंतु अनेक बाधा पार करत मी कॉलेजमध्ये जाणारी आपल्या गावातील पहिली मुलगी ठरले. एका गरीब घरातील आदिवासी क्षेत्रातील महिला आज भारताच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर पोहोचते ही आपल्या लोकशाहीची ताकद असल्याचं मुर्मू म्हणाल्या.

आता मिळाली नवी जवाबदारी
एका महत्त्वपूर्ण कालखंडात देशानं माझी निवड राष्ट्रपती म्हणून केली आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहोत. जेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली होती तेव्हा आपण स्वातंत्र्याची 50 व्या वर्षाचं पर्व साजरं करत होतो. आता 75 वर्षे पूर्ण होताना मला नवी जबाबदारी मिळाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.