दोन भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्या : दोघे युवक ठार

Fatal two-wheeler accident near Faizpur Sugar Factory : Two youths killed फैजपूर : भरधाव दुचाकी एकमेकांवर समोरा-समोर आदळून झालेल्या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाला. हा अपघात फैजपूर शहरातील मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ गुरुवारी रात्री साडेसात वाजता घडला. या अपघातात पावरा नामक तरुणासह धीरज शशिकांत चौधरी (24, रा.आमोदा, ता.यावल) या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन दुचाकी एकमेकांवर आदळून अपघात
गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जवळ दोन दुचाकींची समोरा-समोर धडकल्या. या अपघातात एका दुचाकीवरील पावरा नामक 30 वर्षीय तरूण जागीच ठार झाला धीरज शशिकांत चौधरी (24, रा.आमोदा, ता.यावल) हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ जळगावात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

रात्रीच तरुणाचे निधन
अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमी धीरज याला पहिल्यांदा फैजपूरात हलवल्यानंतर प्रथमोपचार करून जळगावातील खाहगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतांनाच गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणाची प्राणज्योत मालवली.