दोन पोलीस अधिकार्‍यांची उचलबांगडी

0
विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास हयगय भोवली
पिंपरी-चिंचवड : विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास हयगय केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे. विनयभंग प्रकरणाची माहिती मिळताच आयुक्तांनी संबधित सहाय्यक निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली. तर वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांना ठाण्यात निरीक्षक (गुन्हे) म्हणून नियुक्त केले. त्यांच्या जागी यशवंत गवारी यांची नियंत्रण कक्षातून नियुक्ती केली आहे.
पीडितेची आयुक्तांना नोटीस
हिंजवडी येथे मुलींच्या वसतिगृहात अनोळखी मुलाने पहाटेच्या सुमारास येऊन एका तरुणीसोबत अश्‍लील चाळे केले. याप्रकरणी तरुणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तिला चार तास बसवून ठेवण्यात आले. तसेच पोलिसांनी तिच्याशी आरेरावीची भाषा केली. अशी तक्रार तरुणीने वकिलांच्या मध्यस्थीने पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे केली.
हिंजवडी ठाण्यात उलथापालथ
आयुक्तांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली तातडीने नियंत्रण कक्षात केली. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्यावर खातेनिहाय चौकशी बसविण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. त्यात शिवाजी गवारे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून हटवत त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून यशवंत गवारी यांना पाठविण्यात आले. तर शिवाजी गवारे यांना हिंजवडी पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नियुक्ती देण्यात आली.
Copy