दोन जणांवर वाघाचा हल्ला

0

जळगाव । पाचोरा तालुक्यातील वाघूलखेडा येथील दोन जण सोयगाव तालुक्यातील उपलखेडा येथील जंगलात विटभट्टीवर कामाला गेले असतांना या दोघांवर पाठीमागुन वाघाने हल्ला केला. वाघाच्या हल्लात दोन्ही जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. आनंदा मोरे व बबलु माणिक ठाकर दोन्हीही साडूभाऊ असुन त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आनंद मोरे यांना किरकोळ जखम असुन बबलु ठाकरे अधिक जखमी आहे. बबलुला डोक्याला, गालाला, छातीला पाठीला वाघाची नखे लागली आहे. हे दोन्हीही साडूभाऊ असुन जंगलात विटभट्टीवर काम करत असलेल्या दोन जणांवर वाघाने हल्ला केला असून जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचार सुरू आहेत.