Private Advt

दोन गावठी पिस्टलासह आरोपी जाळ्यात : जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव : गावठी पिस्टल विक्री करण्यापूर्वीच तस्कराच्या जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयीताकडून दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली (29, गेंदालाल मील, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परीसरात बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परीसरात बुधवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास संशयीत गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने आरोपीला ताब्यात घेवून कारवाई केली. अंग झडतीत दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील आदींच्या पथकाने केली. दरम्यान, कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास शनिवार, 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील करीत आहे.