दोन्ही युवतींचे विष प्राशन

0

जळगाव। जामनेर येथे आत्या-माम बहिणींनी घरात कुणी नसतांना गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन केल्याची घटना घडली. दोघांना चक्कर येत असल्याचे कळताच कुटूंबियांनी दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दोघांची प्रकृति आता स्थिर असल्याचे समजते.

जामनेर येेथे रहिवासी असलेल्या आत्या-माम बहिणी यांचे दोन तरूणांशी सुत जुळले. दोघीही प्रियकारांसोबत गेल्या तीन चार दिवसांपूर्वी पळून गेल्या. मात्र, पळुन गेल्याच्या दोन दिवसानंतर मुलींच्या नातेवाईकांनी दोघांना शोधून काढत घरी आणले.

यानंतर दोघांना घरच्यांनी पळून गेल्यामुळे मारहाण केली. याचेच वाईट वाटून आज गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दोन्ही आत्या व माम बहिणींनी घरी कुणी नसतांना विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी कुटूंबिय घरी आल्यानंतर दोघांना चक्कर येवू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, दोन्ही बहिणींची प्रकृति स्थिर असून सदर माहिती सुत्रांकडून कळाली आहे.