दोधवत येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

0

जि.प.सदस्या जयश्री पाटील यांचा पाठपुरावा

अमळनेर – मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील दोधवत येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेसाठी 56 लाख निधीची तरतूद झाली आहे. सदर योजनेमुळे गावाची पाणी समस्येतून मुक्तता होणार आहे. यावेळी पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, उपसरपंच मालुबाई पाटील, ग्रा.पं.सदस्य कल्पनाबाई धनगर, मच्छिंद्र भिल, शांताराम भिल, प्रेमसिंग राजपूत, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाउपाध्यक्षा अलका पवार, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष एस.बी.बैसाणे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, राहुल गोत्राळ, शांताराम धनगर, जगन्नाथ धनगर, गोपीचंद धनगर, संजय भोई, बाबुराव धनगर, ज्ञानेश्वर राजपूत, भगवान धनगर, अंबादास कोळी, भैय्या राजपूत, बापू सैंदाणे, भावलाल कोळी, दिपक भोई, मनोज धनगर, मगन भोई, देवीदास पाटील, संतोष कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.