Private Advt

दोघे बुलेटचोर जेरबंद

 

जळगाव – शहरातील हनुमान नगरातून बुलेट चोरी करणार्‍या दोघ तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी खेडी येथून गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

शहरातील हनुमान नगरातील राजेंद्र नवल पाटील यांची एमएच १९ सीएच ११०१ क्रमांकाची बुलेट चोरी झाल्याची घटना १४ रोजी रात्री ११.३० वाजच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाख करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयीत आरोपी हे खेडी येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील यांचे पथक तयार करुन रवाना केले. या पथकाने संशयीत आरोपी शुभम उर्फ कोयता शेखर पाटील (वय-१९) रा. पंढरपुर नगर गोदावरी कॉलेज व ऋतीक राजेंद्र काकडे (वय-२०) रा. इंदिरानगर खेडी या दोघांना खेडी येथून पळून जात असतांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अटक केली. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चोरी करणारा संशयीत आरोपी शुभम उर्ङ्ग कोयता शेखर पाटील याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.