Private Advt

दोंडाईचा शहरातील तरुणीवर अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा

दोंडाईचा : शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणीशी सलगी वाढवून व लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने अत्याचार केला व नंतर तरुणीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपीसह त्याच्या मित्रानेही वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. विशेष म्हणजे तरुणीला नकळत मद्य पाजून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दोघांविरोधात गुन्हा
दोंडाईचा शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरूणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरीफ फारूक तांबोळी (रा.दोंडाईचा) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी जबरीने शरीररीक संबंध (झहूीळलरश्र ठेवले तसेच आरीफसह त्याचा मित्र मुस्तफा शब्बीर खाटीक या दोघांनी तरुणीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तरुणीसह बहिणीची बदनामी करण्याचीही धमकी दिली तसेच दोघांनी तरूणीला जबरदस्तीने दारू पाजुन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना सन 2019 ते दि. 24 एप्रिल 2022 दरम्यान वेळोवेळी घडली. या प्रकरणी दोघांवर भादंवि कलम 376 (1), 376 (2), (एन), 376 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे करीत आहेत.