दोंडाईचातील कुस्त्यांच्या फडात आली रंगत

0

दोंडाईचा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त दोंडाईचा येथे भव्य काटाकुस्त्यांचा ओपन दंगल संपन्न. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गरीब नवाज वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष व दोंडाईचा न.पा.चे उपाध्यक्ष नबु पिंजारी, बांधकाम सभापती छोटू मराठे, नगरसेवक रवी उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते मुरलीभाऊ वंजारी, रणवीर कापुरे, रमेश कापुरे, मक्कन माणिक, अजय बिरारे, रवी नगराळे, गोविंद नगराळे, सागर नगराळे आदि उपस्थित होते. कुस्तीचे पंच म्हणून दिनानाथ पहेलवान व मदन केशे सर हे होते. ओपन दंगलचे आयोजक कृष्णा नगराळे व शिवा नगराळे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. वरवाडे भागातील आंबेडकर चौकात नदीपात्रात रंगलेल्या या कुस्तीच्या फंडाची सुरुवात लहान मुलांच्या कुस्तीपासून करण्यात आली. यावेळी आखाडयाचे व प्रतिमा पुजन उपनगराध्यक्ष नबु पिंजारी यांनी केले. यावेळी नंदुरबार, दोंडाईचा, शेवाळे, उडाणे, गोताणे, धमाणे येथील पहेलवानांनी मैदान गाजविले.