दैनिक जनशक्तीच्या वृत्ताची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

0

प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत दिव्यांगाच्या समस्यांना फोडले वाचा

जळगाव: जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देतांना खाजगी दलालाच्या माध्यमातून दिव्यांगांची आर्थिक लुट केली जात असल्याचे वृत्त दैनिक जनशक्तीने ‘दिव्यागांची नशीबाकडून अन् प्रशासनाकडूनही थट्टा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती. या वृत्ताचा हवाला देत भुसावळचे दिनेश उपाध्याय यांनी मुख्यमंत्री यांना ई-मेलकरून तक्रार केली होती. या तक्रारीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून याप्रकरणी सामाजिक न्याय विभागाला पुढील कार्यवाही करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती दिनेश उपाध्याय यांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे.

दैनिक जनशक्तीच्या वृत्ताची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल 1

जिल्हा रुग्णालयात अपंगत्व नुतनीकरणाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी खाजगी पंटरने तीन हजार तसेच कागदपत्रे घेतले. तीन ते चार महिने उलटूनही पंटरने नूतनीनकरण प्रमाणपत्र न देता दिलेले तीन हजार रुपये गडप करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. फसवणुकीची खात्री झाल्यावर हाताने अपंगत्व असलेले विश्वास रंगराव पाटील वय 47 रा. कंकराज ता.पारोळा यांनी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरुन उमेश पाटील नामक खाजगी पंटर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यानच्या काळात लोकशाही दिनापर्यंत धाव घेतली. न्याय न मिळता, उलट 40 टक्के अपंगत्व असतांना केवळ 15 टक्के अपंगत्व असल्याबाबत, तीन महिने मुदतीचे कार्ड मिळाल्याने विश्वास पाटील यांची प्रशासनाकडून उपेक्षाच करण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली होती.

Copy