Private Advt

दैनिक जनशक्तीच्या जळगाव कार्यालयाचे उद्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

जळगाव : खान्देशी मातीशी एकरुप झालेल्या व जिल्ह्यातील नावलौकीक प्राप्त अशा दैनिक जनशक्ती वृत्तपत्राच्या जळगावातील नूतन कार्यालयाचे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते शनिवार, 7 रोजी दुपारी 3.30 वाजता उद्घाटन होत आहे. जनशक्तीवर प्रेम करणार्‍या वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन मुख्य संपादन यतीन ढाके, निवासी संपादक युवराज परदेशी व मुख्य व्यवस्थापक धन्यकुमार जैन यांनी केले आहे.

जनशक्तीची गगनभरारी
जळगाव, धुळे व नंदुरबार या खान्देशातील तीनही जिल्ह्यांसोबत जनशक्तीने आता नाशिकमध्ये पाय रोवत वाचकांची विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. बदलत्या काळाशी सुसंगत होत दैनिक जनशक्तीने आता प्रिंट मिडीयासोबत डिजिटल मिडीयातही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. अल्पावधीत वाचकांच्या मनात हक्काचे घर निर्माण केलेल्या जनशक्तीने आणखी एक पाऊल पुढे टाकत नूतन कार्यालयात स्थलांतर केले असून या कार्यालयाचे शनिवार, 7 रोजी दुपारी साडेतीन वाजता मंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन होत आहे. नवी पेठेतील चित्रा चौकातील रायसोनी चेंबर्समधील दुसर्‍या माळेवर सुरू झालेल्या प्रशस्त अशा कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास जनशक्तीवर प्रेम करणार्‍या वाचकांसह जाहिरातदार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन जनशक्ती परीवाराने केले आहे.