देहूरोड येथे संविधानदिन रॅली, प्रास्ताविकेचे वाचन करून साजरा

0

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची माहिती रूजविणारे शिक्षक डी.एम.तापकिर सन्मानित

विविध राजकिय पक्ष आणि संघटनांनी केले आयोजन

देहूरोड : संविधान दिनानिमित्त शहरात संविधान रॅली, मिरवणूका आणि ठिकठिकाणी संविधानाच प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. विविध राजकिय पक्ष आणि संघटनांनी कर्यक्रमांचे आयोजन केले होते. देहूरोड येथे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाच्या आवारात डॉ. आंबेडकर पुतळयाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष सारिका नाईकनवरे, बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारिमुत्तू, गोपाल तंतरपाळे, भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. कैलाश पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अली शेख, सुनिल कडलक, गुरमित सिंग, अंजनी बत्तल, मनिष ओव्हाळ, संजय धुतडमल, संजय ओव्हाळ, बापूसाहेब गायकवाड, रविंद्र कदम, तुकाराम जाधव, संजय आगळे, प्रकाश ओव्हाळ आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह मोठ्य संख्येने विविध क्षेत्रातील पाहुणे उपस्थित होते.

संविधानाचे केले पूजन

सारिका नाईकनवरे देहुरोड पोलीस ठाण्याचे फौजदार अबुबकर लांडगे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर संविधानाचे पूजन करण्यात आले. विशाल खंडेलवाल, अ‍ॅड. दाभोळे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांनी संविधान दिनाच्या शुभेच्या दिल्या. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची माहिती रूजविणारे शिक्षक डी.एम.तापकिर यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या 26/11 च्या घटनेत शहिद झालेल्या पोलीसांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. धर्मपाल तंतरपाळे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

संविधानाच्या प्रतिकृतीची मिरवणूक

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल नाईकनवरे व मित्र परिवाराच्यावतीने बाजारपेठेतून संविधानाच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष सारिका नाईकनवरे, भाजप शहराध्यक्ष अ‍ॅड. कैलास पानसरे यांच्या हस्ते संविधान प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. के.एच.सुर्यवंशी, धर्मपाल कांबळे, विजय गायकवाड, महेंद्र गायकवाड रोहन गायकवाड आदी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. ऐतिहासिक धम्मभूमी येथे अमदार बाळा भेगडे यांनी रॅलीचे स्वागत केले. आमदार भेगडे यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. ऐतिहसिक धम्मभूमी येथील बुध्द विहार कृती समिती, धम्मभूमी सुरक्षा समिती आणि महिला सुरक्षा समितीच्यावतीने धम्मभूमी येथून संविधान रॅली काढण्यात आली होती. बुध्दविहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, अशोक गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे, बापूसाहेब गायकवाड, संगिता वाघमारे, अशोक वाघमारे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. डॉ. आंबेडकर पुतळा येथे रॅलीचा समारोप झाला.

Copy