देहूरोड येथे शीख धर्म स्थापना दिनानिमित्त रॅली

0

देहूरोड : शीख धर्म स्थापनादिनानिमित्त देहूरोड येथे शीख बांधवांची भव्य रॅली काढण्यात आली होती. बोले सो निहाल…सत्श्री अकाल अशा घोषणा देत सुमारे दीडशे दुचाकीस्वारांची ही रॅली उत्साहात पार पडली. या रॅलीत चारचाकी वाहनेही सहभागी झाली होती. शीख धर्म स्थापना दिनानिमित्त शीख धर्मिय युवकांची दुचाकी व चारचाकीची भव्य रॅली काढण्यात आली. पुण्यातील गुरूनानक दरबार गुरूद्वारातून सुरू झालेली रॅली मार्गातील सर्व गुरुद्वारांना भेटी देत येथे सायंकाळी पोहचली.

महामार्गावरील वाहतूक कोंडी टळली
यावर्षी महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असून सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याची दक्षता घेऊन प्रथमच रॅली रावेतकडून कात्रज बाह्यवळण रस्त्याने देहूरोड येथे दाखल झाली. शीख यंग सर्कलच्यावतीने आयोजित या रॅलीमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन तरुण सहभागी झाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास या रॅलीचे गुरुसिंग सभा गुरूद्वारा येथे आगमन झाले. आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारिमुत्तू, लहूमामा शेलार, रघूवीर शेलार, गुरूसद्वारा कमिटीचे अध्यक्ष गुरूमितसिंग रत्तु, परमजीतसिंग चटवाल, गुरूचरणसिंग राजू, मनजितसिंग चढ्ढा, मिकी कोचर, इंद्रपालसिंग रत्तू आदी यावेळी उपस्थित होते. महामार्गावर न येता शहरातील अंतर्गत रस्त्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे रविवार असूनही महामार्गावर वाहतूक कोंडी टळली.