देशी-विदेशी दारूची बेकायदा वाहतूक : आरोपी जाळ्यात

0

भुसावळ : देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी भगवान सावळे (फेकरी) यास तालुका पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 12 हजार 472 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, युनूस इब्राहिम शेख, अर्चना अहिरे, शिवाजी खंडारे, प्रेमचंद सपकाळे व मजीद पठाण यांनी केली.