देशासाठी खेळण्याचे दिव्यांगाचे स्वप्न

0

औरंगाबाद । महानगरपालिकेत क्रिडा विभागात असीफ पठाण कर्मचारी आहे. त्यांच्या घरात 13 वर्षापुर्वी मोहसीनचा जन्म झाला. जन्म होताच त्याला अतिदक्षता विभागात 7 दिवस ठेवण्यात आले. जन्म झाल्याबरोबर त्याच्या शरीराची उजवी बाजू कमजोर होती.असे असले तरी त्याच क्षणी आपल्या घरी आलेल्या या दिव्यांग मोहसीनला राष्ट्रीय खेळाडू घडवायचा निर्धार केला होता.कारण असीफ पठाण औरंगाबादचे 1994 ते 1997 या काळात दर्जेदार फुटबॉलपटू होते.त्यांनी आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले तसेच अनेकदा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेतही औरंगाबाद जिल्ह्याकडन आपला ठसा उमटवला होता.

राज्य पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका
जन्म:तच दिव्यांग असतांनाही मोहसीनने अफाट जिद्दीच्या जोरावर आपल्या अपंगात्वर मात करीत राज्य पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका करण्याची किमया साधली. अवघ्या 13 वर्षांचा आहे.मात्र मोहसीनची मनात निश्‍चिय केला आहे की, देशाला पदक जिंकून देण्याचे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असेच ही म्हण औरंगाबादचा प्रतिभावान बाल अ‍ॅथलिट मो. मोहसीनला पाहून खरी ठरते. वडील स्वत: दर्जेदार फुटबॉलपटू आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना जन्मत:च दिव्यांग असताना बाल खेळाडूने राज्य स्पर्धा गाजवली आणि आता तो जयपूर येथे होणार्‍या राष्ट्रीय पॅराअ‍ॅथेलिटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राकडून पदकविजेती कामगिरी करण्यासाठी आतुर झाला आहे.

रत्नागिरी येथे 28 ते 30 जानेवारीदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय पॅराअ‍ॅथेलिटिक्स स्पर्धेत मो. मोहसीनने भालाफेकीत सुवर्णपदक आणि थाळीफेकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. जयपूर येथे 27 मार्चपासून सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात मोहसीनची निवड झाली आहे.राष्ट्रीय स्पर्धेसाठी मो. मोहसीन सध्या विद्यापीठाच्या अ‍ॅथलेटिक्स मैदानावर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत राज्य पॅराअ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष विनोद नरवडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. मुलगा राष्ट्रीय खेळाडू बनणार असल्याने आपले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना असीफ पठाण यांची आहे.

मुलगा दिव्यांग असला तरी त्याची जाणीव होऊ नये यासाठी त्यांनी वयाच्या चौथ्याच वर्षी आपला मुलगा मो. मोहसीनला आपल्यासोबत मैदानावर नेण्यास सुरुवात केली. याचा फायदा त्यांच्या मुलाला खेळात रस निर्माण होण्यात झाला.शरीरातील उजवा भाग कमजोर असतानाही लंगडतच मोहमद मोहसीन फुटबॉल खेळू लागला. दरम्यानच्या काळात असीफ पठाण यांची औरंगाबाद जिल्हा पॅराअ‍ॅथलिटिक्स संघटनेचे सचिव डॉ. दयानंद कांबळे यांच्याशी भेट झाली.- मोहमद मोहसीन खान हा अवघ्या 13 वर्षांचा आहे. बुर्‍हाणी नॅशनल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणार्‍या मो. मोहसीन खान याने माझे स्वप्न हे पॅरॉलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्याचे आहे. जयपूर येथे होणार्‍या राष्ट्रीय पॅरॉलिम्पिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदक जिंकण्याचा निरधार केला आहे.