देशात पशु वाचेल तर देश, पर्यावरण वाचुन स्वास्थ चांगले राहिल

0

चाळीसगाव । एखाद्या बाळाला आई सोडून गेल्यास त्याला खायला मांस देऊ शकत नाही, त्याला दुधच द्यावे लागते म्हणून त्याबाळासाठी गाईचे महत्व जास्त आहे. आई ठराविक वेळा बाळाला दुध पाजते गाय मात्र आयुष्यभर दुध पाजते म्हणून गाय आईपेक्षा श्रेष्ठ आहे. पशु वाचेल तर देश, पर्यावरण वाचेल तर स्वास्थ चांगले राहील असे मत राष्ट्रसंत कमलमुनि कमलेश यांनी रविवारी 12 रोजी अरिहंत मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. काश्मिर ते कन्याकुमारी सह पुर्ण देशात गो-हत्या बंदी व इतर पाच कलमी कार्यक्रमाच्या उद्देशाने ते चाळीसगाव येथे आले होते. गो-संवर्धनाविषयी संदेश देण्यासाठी 70 हजार कि.मी.पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉलीथीन वर बंदी हवी पॉलीथीन मुळे पर्यावरणाचा नुकसान होत असते. तसेच गायींकडून पॉलीथीन खाल्ले गेल्यास गायी मृत पावतात. तसेच काही गायींच्या पोटात जवळपास 50 किलोच्यावर पॉलीथीन निघत असल्याने गो-संरक्षण करणे गंभीर बनले आहे. पॉलीथीन वापरावर बंदी घालुन पॉलीथीन निमित्ती बंद केल पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. धर्माच्या नावावर जेवढा खुन खराबा झाला तेवढा हत्याराने देखील झाला नाही. नास्तिक पेक्षा जास्त खतरनाक हे धर्माचे ठेकेदार आहेत. राजकारणात 75 वर्षांची मर्यादा ठेवून नेत्यांना निवृत्त केले पाहीजे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले

यांची होती उपस्थिती
चाळीसगाव तालुक्यातील प्रणव गृप ने गौशाळेसाठी 61 हजार रूपये देण्याचे यावेळी जाहीर केले. या पत्रपरिषदेस राष्ट्रसंत कमलमुनि कमलेश यांच्यासह घनशान मुनिजी, कौशल मुनिजी, किशोर गांधीमुथा, प्रेमचंद खिवसरा, पारस चौरडीया, सुरेश औस्तवाल, संजय सुराणा, राजमल चित्रमुथा, दिलीप राका आणि संजय बागमार आदी समाज बांधव उपस्थित होते.

प्रत्येक गावात गो-शाळा
देशभरात राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या वतीने दिडशे गो-शाळा चालविल्या जात असुन या गो-शाळेत मुस्लिम बांधवांनी काही नियम देखील घालुन दिले आहे. गाय कापतांना कोणाला पकडले तर 1 लाख दंड व कारवाई केली जाते. तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात 1 हजारावर गो-शाळा बनविण्याचे जाहिर करण्यात आले असून इतर राज्यांनी देखील तसे करावे. देशातील प्रत्येक गावात गो-शाळा निर्माण करण्याची आमची महत्त्वाकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.