देशात कोरोनाचा कहर सुरूच; २४ तासात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचे संकट आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दररोज देशात ३० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान मागील २४ तासात देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासात ३८ हजार ९०२ नवे करोनाबाधित आढळले असून, ५४३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आता देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १० लाख ७७ हजार ६१८ वर पोहचली आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील मोठे आहे. ६ लाख ७७ हजार ४२३ जणांना करोनावर मात केलेली आहे.

सद्यस्थितीस देशात ३ लाख ७३ हजार ३७९ जणांवर उपचार सुरू आहेत. देशभरात करोनामुळे २६ हजार ८१६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात १८ जुलैपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ नमूण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. जगात आतापर्यंत एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ करोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर करोना बळींची संख्या सहा लाख चार हजार ९१७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८६ लाख १२ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. ५२ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Copy