देशाच्या सुरक्षेशी तडजोड नाही; पहिल्याच दिवशी लष्कर प्रमुखांनी ठणकावले

0

नवी दिल्ली: जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पदभार स्वीकारला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू. आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे असे सांगत देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही असे मनोज नरवणे यांनी यांनी ठणकावून सांगितले आहे.

‘आम्ही आमची क्षमता अधिक वाढवणार आहोत. जवान हे देश सुरक्षित ठेवतील. लष्करी कारवाईसाठी सदैव तत्पर राहणं हे आमचं प्राधान्य असेल’ असं देखील नरवणे यांनी म्हटलं आहे. शेजारच्या देशाने दहशतवादाला खतपाणी देणे थांबवले नाही, तर दहशतवादाचा उगम जेथून होतो तेथे हल्ला करण्याचा हक्क भारताने राखून ठेवला आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता.

Copy