देशभक्तीचे धडे देणारी कॉंग्रेस सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करते-मोदी

0

जयपूर-आज दहावर्षापूर्वी २६ नोव्हेंबरला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. संपूर्ण देश या घटनेमुळे हादरला होता. मात्र कॉंग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी खेळ खेळत होती. त्यावेळी देश भक्तीचे धडे शिकविणारी कॉंग्रेस आज सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करीत आहे असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसव केले आहे.

राजस्थानमधील भीलवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभा घेत आहे. त्यावेळी ते बोलत होते.

आज २६ नोव्हेंबर आज ज्यावेळी दिल्ली रिमोट कंट्रोलवर चालू होती, तेंव्हा महाराष्ट्रात कॉंग्रेसची सरकार होती. आज कॉंग्रेसवाले एसीच्या घरात बसून भाजपला पराभूत करण्याची भाषा करीत आहे असे आरोप मोदींनी केले आहे.

Copy