Private Advt

देव्हारी कनाशीत विष पाजून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न : तिघांविरोधात गुन्हा

भडगाव : महिलेने घर खाली करण्यास सांगितल्यानंतर संशयीतांना राग आल्याने त्यांनी महिलेला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील देव्हारी कनाशी येथे 29 रोजी घडली. या प्रकरणी तिघां विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
निला अरुणदेवरे (53, रा.श्रमिक नगर, नाशिक, ह.मु.देव्हारी कनाशी, ता. भडगाव) या महिला आपल्या पती व कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांचे घर अजबराव हिलाल पाटील यांना भाड्याने दिले आहे. 29 एप्रिल रोजी निला देवरे यांनी अजबराव पाटील यांना घर खाली करून द्या, असे सांगितले व याचा राग आल्याने संशयीत अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबूराव पाटील (तिन्ही रा.देव्हारी कनाशी, ता.भडगाव) यांनी विवाहितेला विषारी औषण पाजून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला तर पती अरुण देवरे यालादेखील बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. विवाहितेला अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील (रा.देव्हारी कनाशी, ता.भडगाव) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.