देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील वाहनाला जळगावात अपघात

0

जळगाव:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरा करत आहेत. आज बुधवारी संध्याकाळी नाशिकचा दौरा आटोपून जळगावात दाखल झाले आहे. दरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहनाला नाशिराबादला अपघात झाला आहे. या अपघातात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला. ताफ्यातील एका गाडीने पुढे असणाऱ्या दरेकर यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. दरेकर यांनाही किरकोळ दुखापत झाली.

आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जळगावात दाखल झालेत. जळगावमध्ये उद्या त्यांचा दौरा आहे. ते जळगावमधील रुग्णालयांना भेट देऊन करोना व्हायरसच्या स्थिती संदर्भात माहिती घेणार आहेत.

Copy