देवा सोनार यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

0

शिरपूर। धुळे शहरातील देवा सोनार यांच्यावर राजकीय आकसापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे त्यांची समाजात बदनामी होत असल्याने तो गुन्हा मागे घ्यावा अशा आशयाचे निवेदन शिरपूर येथील हेल्पींग पॉइर्ंंट ग्रृपच्या वतीने येथील उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले. या निवेदनावर गृ्रपच्या सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.

राष्ट्रवादीच्या माजी महापौर जयश्री अहिरराव व मनोज मोरे यांना हाताशी धरून देवा सोनार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सोनार यांची समाजात बदनामी होत असून सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करून मागे घ्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर हेल्पींग पॉईंट ग्रृपचे मोहीत सोनार, अमोल सोनार, करण पाटील, विनोद पाटील, दिपक कोळी, हितेश सोनार, धनंजय पाटील, आशिष सराफ, पंकज मराठे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.