देवमोगरा निसर्गरम्य परिसरात स्काऊट शिबीर

0

नवापूर । श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमिक विभागातील स्काऊट शिबीर देवमोगरा (गुजरात) येथे आयोजित करण्यात आले होते. दोन दिवस देवमोगरा या निसर्गरम्य परिसरात चाललेल्या या शिबिरात विद्यार्थाना गाठीचे प्रकार, उघड्यावरील स्वयंपाक, मनोरंजन खेळ, गीते, शेकोटी कार्यक्रम, गिर्यारोहण असे विविध उपक्रम घेण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन प्लास्टिक पिशव्या, कागद गोळा करून प्लास्टीकमुक्त परिसर केला. तसेच वृक्षारोपण देखील केले.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शिबीराला शाळेचे प्राचार्य आर व्ही पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील, पर्यवेक्षक प्रविण पाटील, विनोद पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थाचा कलागुणांचे कौतुक करून मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिबीर एन एन सोनवणे, जी डी सुर्यवंशी, ए जी रजाळे, प्रशांत बी पाटील, जी पी कोळी, एस जी बंजारा, एन एस बागुल, व्हि जे पाटील, पी पी ठाकरे पी एम पाटील यांनी परिश्रम घेतले