देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

0

जामनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील देवपिंप्री येथे ग्राम पंचायतीच्या निवडणूकिला हाणामारीमुळे गालबोट लागले आहे. निवडणुकीच्या वादातुन दोघांमध्ये हाणामारी होत एकावर चाकुने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy