देवगांव येथे तरुणाची आत्महत्या

0

धानोरा- चोपडा तालुक्यातील देवगांव येथे भरदुपारी तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. सुनिल गोकुळ पाटील (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या बाबत धानोरा पो . पा . दिनेश पाटील यांच्या खबरीवरून अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्युची नोंद केली आहे. पुढील तपास हे .कॉ. जगदीश कोळंबे करीत आहे .

Copy