देवगांव देवळी हायस्कूल महापुरूषांना अभिवादन

0

अमळनेर – तालुक्यातील देवगांव देवळी महात्मा जोतीराव फुले हायस्कूलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल महाजन होते. तर अतिथी अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, आय.आर.महाजन, एच.ओ.माळी होते. सकाळी शाळेचा परीसर स्वच्छ करण्यात आला. महात्मा गांधी जयंतीचे औचीत्य साधून शाळेत सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले. यासाठी सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर यांनी विजेता गटातील विदयार्थीना दहा पुस्तके सानेगुरुजी व महात्मा गांधीची दिली आहेत.

शाळेचे शिक्षक सोनटक्के यांनी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले कि महात्मा गांधी, व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शाळेत विद्यार्थ्यांनसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असून सामान्य ज्ञान परीक्षेच्या माध्यमातून विदयार्थीनच्या ज्ञानात भर पडुन कल्पना शक्तीला वाव मिळेल. असे सांगितले. महात्मा गांधी यांनी आम्हाला सत्याचा मार्ग शिकवला तर लालबहादूर शास्त्री यांचे शेतकरी बांधवाबददलचे धोरण यावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी तर आभार प्रर्दशन एस.के.महाजन यांनी कैले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Copy