दूषित पाणी पाजणारा ग्रामसेवक निलंबित

0

जळगाव – धरणगांव तालुक्यातील सतखेडे गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे आतापर्यंत 40 लोकांना बाधा झाली असून, यासाठी कारणीभूत ग्रामसेवक नामदेव दगडू शिंपी यांना निलंबित करण्यात आले आहे. बाधितांवर गावातील जिल्हा परिषद शाळेत उपचार केले जात आहेत.

धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील ग्रामसेवक नागदेव दराडू शिंपी यांच्यावर कारवाई करताना गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. अनधिकृतपणे कर्तव्यावर गैरहजर असणे, कार्यालयीन कामकाज वेळेत न करणे, कोविड 19 साथरोग नियंत्रण व मान्सूनपूर्व उपाययोजना न करणे, ग्रा. पं. कार्यालयीन कामकाज पूर्ण न करणे, विकासकामांची उद्दिष्टपूर्ती न करणे इत्यादी त्रुटी निदर्शनास आल्याने शिंपी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे , साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब बाभळे, तालुक्याच्या गट विकास अधिकारी स्नेहा कुडचे, उपअभियंता रमेश वानखेडे, जलनिरिक्षक दीपक राजपूत, पाणी गुणवत्ता सल्लागार धीरज भदाणे यांनी गावात पाहणी केली. पाईपलाईनची गळती दुरुस्ती करणे, पाणी शुध्दीकरणासाठी टी सी. एल. पावडरचा पुरेसा वापर करणेबाबत सरपंच व कर्मचारी यांना सूचना केल्या आहेत.

Copy