दुसखेडा गावातील 10 जणांवर वीजचोरीचा गुन्हा

0

यावल- दालुक्यातील दुसखेडा येथे वीज वितरण कंपनीच्या पथकाने शुक्रवारी (द.28) अचानक तपासणीची मोहीम राबवली. या मोहीमेत गावातील दहा जण वीजचोरी करताना आढळले. या सर्वांना दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यामुळे शुक्रवारी यावल पोलिसात दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. पाडळसा येथील सहायक अभियंता योजना चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुसखेडा येथील सोनू भागवत सोनवणे, मनोहर भालचंद्र सोनवणे, योगराज पोलाद पाटील, लक्ष्मण राघो तायडे, नारायण सदाशिव सोनवणे, सुभाष रघुनाथ तायडे, संजय विठ्ठल सोनवणे, अजय प्रकाश चौधरी, छगनसिंग भाऊसिंग बिलाला व बळीराम पुंजो सोनवणे यांना वीजचोरी प्रकरणी 17 हजार 563 रुपयांचा दंड केला होता.

Copy