दुष्काळी स्थिती पाहता सर्वांनी ‘मिशन मोड’वर कामे करावीत-मुख्यमंत्री

0

औरंगाबाद : पुढचा काळ दुष्काळाचा आहे. आपत्तीला इष्टापत्तीमध्ये रुपांतर करून सिंचानाची व इतर कामे ‘मिशन मोड’ वर करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीचा आढावा बैठकीत केल्या.

जिल्ह्यातील १३३५ गावे दुष्काळाच्या संकटात आली आहेत. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत २०० च्या आसपास पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या दुष्काळसदृश स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी त्यांनी, जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागाने दुष्काळी स्थिती बाबतची कामे पूर्ण करावीत यात कोणीही मागे राहू नये, ‘मिशन मोड’वर राहून सर्वांनी कामे करावीत अशा सूचना दिल्या.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी, कालावधीत पुढचा काळ दुष्काळाचा आहे, येणाऱ्या कालावधीत शेततळे, विहिरी व जलसंधारणाची कामे पूर्ण करावीत, या आपत्तीला इष्टापत्तीमध्ये रुपांतर करा असे आदेश देत डिसेंबरमध्ये पुन्हा बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

Copy