दुष्काळी तालुक्यातील परीक्षा फी माफीच्या घोषणेने पालकांमध्ये संभ्रम

0

सरकारची घोषणा मात्र अद्याप परीपत्रक नाही

चाळीसगाव- राज्यातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफीची शासनाने घोषणा केली जिल्ह्यात सर्वच तालुके दुष्काळी तालुके घोषित केले आहे एकट्या चाळीसगावात दहावीचे पंधरा हजार तर बारावीचे सहा हजार विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसले आहेत मात्र अद्याप बोर्डाकडून कुठलेही परिपत्रक शाळा व महाविद्यालयांना अद्याप प्राप्त झाले नसल्याने फी भरावी किंवा नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे

जिल्ह्यात सर्वच तालुके दुष्काळी
शासनाने यापूर्वीच जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळी तालुके घोषित केले आहे या अनुषंगाने शुक्रवारी शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत खंड पडू नये यासाठी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफी चा महत्वाचा निर्णय घेतला आहे यंदा दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागासह शहरी भागात शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना पोहचणार आहे त्या अनुषंगाने या शासन निर्णयाचे स्वागत करण्यात आले मात्र उद्या सोमवार दि. 26 ही दहावीचे परीक्षा फी भरण्याची शेवटची मुदत असल्याने पालकांकडून शाळा व्यवस्थापनाकडे परीक्षा फी भरण्याबाबत संभ्रम निर्माण होणार आहे.

उद्या फी भरावी की नाही ?
या वर्षी बसलेले दहावीच्या विद्यार्थ्यांना ही फी माफीची सवलत शासनाच्या परिपत्रकानुसार लागू होणार आहे मात्र उद्या सोमवार दहावी परीक्षा फी भरण्याची शेवटची मुदत आहे त्यामुळे ते परीक्षा फी भरावी किंवा नाही या द्विधा मनस्थितीत सापडले आहेत नेमका शाळांना अद्यापही परिपत्रक प्राप्त नसल्याने त्यांनाही विद्यार्थ्यांकडून फी घ्यावी लागेल अशी संभ्रमावस्था सर्वच शाळांमध्ये दिसून येत आहे तशी कुजबुज पालकांमध्ये देखील आज दिवसभर दिसून आली आहे. सुटी असूनदेखील अनेकांनी शाळा व्यवस्थापनाकडे चौकशी सुरू केली आहे

शासनाचे अद्याप पत्र नाही
दुष्काळी भागात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ असल्याबाबत अद्याप परिपत्रक प्राप्त नाही किंवा बोर्डाकडून देखील काही सूचना नाही ही शुल्क माफीची घोषणा आम्हाला देखील प्रसारमाध्यमांकडून कळाली आहे त्यामुळे परीक्षा फी भरण्याची प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती चाळीसगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी जनशक्ति शी बोलताना सांगितले तर यापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने अश्याच परिस्थितीत फी शुल्क माफीची सवलत दिली होती मात्र तो पर्यंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी परीक्षा फी भरून टाकली होती ती शासनाने नंतर परत केली होती, अशी आठवण डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.

Copy