दुचाकी चोरास रावेर पोलिसांनी घेतले ताब्यात

0

मोटरसायकल हस्तगत
रावेर – मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस अटक करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे त्याच्या कडून चोरीची मोटर सायकल हस्तगत केली आहे. याबाबत वृत्त असे की, रावेर येथून बसचालक कन्हैय्या अटकाळे यांनी त्यांची बजाज बॉक्सर सीटी कंपनीची मोटर सायकल क्र (एमएच १९ यु ३१९५) ही ६ नोहेंबर २०१७ रोजी लावली होती. अज्ञात चोरटयांनी मोटरसायकल चोरुन नेली याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटरसाइकिलचे गुह्यात वाढल्याने पोलिसा समोर तपासाचे मोठे आव्हान होते. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी गजानन प्रताप वानखेने वय ३० या कोथळी ता मोताळा ह मु शनिपेठ जळगाव येथून ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबूली दिली. त्याच्याकडून चोरी केलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे सदर गुन्हाचा तपास उघड करण्यासाठी पो.ना.रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली हे.कॉ.इस्माईल शेख, पो.कॉ.ओम प्रकाश सोनी, पो.कॉ. सुरेश मेढे यांनी कामगिरी बजावली समांतर तपासात एलसीबी विभागाचे सहकार्य लाभले.