Private Advt

दुचाकी चोरटे जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : जळगाव खुर्दसह भुसावळातील दुचाकी चोरट्याच्या जळगाव शहर पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. रुपेश अविनाश कोळी (30, जळगाव खुर्द, ता.जळगाव) व विनोद काशीराम तायडे (34, साकरी फाट्याजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रवींद्र हिलाल इंदवे यांची दुचाकी रेल्वे स्टेशन परीसरातील आरआरआय कॅबीन परीसरातील दुचाकी दोघा चोरट्यांनी 23 एप्रिल रोजी लांबवली होती. या चोरीबाबत जळगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक वजयकुमार ठाकुरवाड यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. कोळी व तायडे यांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा कबुल करीत दुचाकी काढून दिली. ही कारवाई गुन्हे शोध पथकातील तेजस मराठे, योगेश इंधाटे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, गजानन बडगुजर, प्रफुल्ल धांडे, रतनहरी गीगते, राजकुमार चव्हाण, योगेश पाटील व योगेश बोरसे आदींच्या पथकाने केली. दरम्यान, अटकेतील चोरट्यांकडून आणी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.