दुचाकी चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ :  भुसावळसह जळगावातून पाच दुचाकी लांबवणार्‍या तिघा चोरट्यांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशाल मधुकर इखे (24, चिंचोली, ता.जळगाव), गोपाल राजेंद्र पाटील (23, चिंचोली, ता.जळगाव), ज्ञानेश्वर शिवाजी हेमाडे (30, चिंचोली, ता.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी भुसावळ बाजारपेठ हद्दीतील दोन जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लांबवल्या होत्या. दरम्यान, आरोपींचा मुकुंदा सुरवाडे व अनिल नामक साथीदार पसार आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाी सहा.फौजदार अशोक महाजन, सहा.फौजदार शरीफ काझी, नाईक युनूस शेख, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, रणजीत जाधव आदींच्या पथकाने केली.