Private Advt

दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून संशयीताला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (25, गोहरी, ता.जामनेर, ह.मु.कमल पॅराडाईज मंगल कार्यालय, जळगाव)असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

संशय आल्याने चोरटा अडकला जाळ्यात
एमआयडीसी पोलिस स्थानकातील शोध पथकातील पोलिस नाईक किशोर पाटील व पोलिस कॉन्स्टेबल मुकेश पाटील हे मंगळवार. 26 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अजिंठा चौकात पेट्रोलिंग करत असताना संशयीत आरोपी
ज्ञानेश्‍वर पाटील याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली आहे. चोरलेल्या दुचाकीबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयीताला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोलिस नाईक किशोर पाटील, चेतन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील यांनी कारवाई केली.