दुचाकी-कारच्या अपघातात दोन बालकांचा मृत्यू

0

जळगाव : हरियाणातील अंबाला येथे लष्कारात कार्यरत असलेला एरंडोल तालुक्यातील जवान सुटीवर घरी आला होता. आज शनिवारी जामनेर तालुक्यातील बहीणाला भेटण्यास कुटुंबासह मोटारसायकलवर वाडेकिल्ला येथे जात असतांना दुपारी साडेबारा वाजता विटनेर जवळ समोरुन येणार्‍या भरधाव वॅगेनार कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील 7 वर्षीय बालिका व अडिच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जवान व त्याची पत्नी जखमी झाली. विशेष म्हणजे रस्त्यात पद्मालयाच्या गणपतीचे दर्शन घेवून निघाल्यानतंर तासाभरात ही घटना घडली. दरम्यान, अपघाताला कारणीभुत व्हॅगनार चालकाला गावकर्‍यांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या अपघातात मोटारसायकलवरील बालिका गुणस्वी (वय 7 ) व बालक विराट (वय अडिच वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. जवान विजय पुंडलिक महाजन व त्यांची पत्नी दर्शना हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे महाजन कुटुंबियानां फार मोठा धक्का बसला आहे. चिमुकल्यांच्या मृत्युचे वृत्त कळात हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी हृदय हेलवाणारा आक्रोश केला होता.

विजय महाजन हरियाणामधील अंबाला येथो लष्कारात कार्यरत आहेत. पत्नी दर्शना, मुलगी गुणस्वी (वय 7) व मुलगा विराट यांच्यासह तेथेच राहतात. 25 दिवसांची सुटी घेवून ते जळगाव जिल्ह्यताल एरंडोल तालुक्यात असलेल्या गालापूर या आपल्या मुळगावी 11 डिसेंबरपासून आले होते. आज शनिवारी जामनेर तालुक्यातील वाडेकील्ला येथे राहणारी त्यांची बहीण सुवर्णा पाटील हीला भेटण्यासाठी जाण्याचा बेत त्यानीं केला होता. शनिवारी बहीणीकडे मुक्काम करुन रविवारी हिवरखेड येत्रे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमास त्यांना जायचे होते. त्यामुळे ते सकाळीच पत्नी व दोन्ही मुलांनो घेवून मोटारसायकल (एम.एच. 19 बी.आर.1042) वरुन वाडे किल्ला गावाकडे निघाले.

वाडे कील्ला जात असतांना रस्त्यात पद्मालय लागल्याने महाजन कुटुंबाने तेथे जावून गणरायाचे दर्शन घेतले. त्यानतंर ते पुन्हा रस्त्याला लागले. विटनेर गावाजवळून 1 की. मी. अंतरावर असतांना दुपारी साडेबारा वाजता समोरुन भरधाव वेगाने आलेल्या वॉगेनार कार (एम.एच. 12 एल.व्ही. 4978) ने त्यांना महाजन यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेली कार रस्त्याच्या बाजूला धडकली. या अपघातात. मोटारसायकलवरील गुणस्वी व विराट यांचा जागीच मृत्यू झाला. महाजन पतीपत्नी जखमी झालेत. वसंतवाडीचे प्रदिप पाटील म्हसावद पोलिस चौकीचे जितेंद्र राठोड , सुनिल मगरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेवून अपघातग्रस्थांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले.

कार चालकास चोप
अपघातात जखमी पती-पत्नीला उचलून बसवल्यावर मुगगी व अडीचवर्षीय बाळ जागीच ठार असल्याचे कळताच ग्रामस्थांचा संताप होत वॅगेनार कारवरील चालकात गाडीतून ओढत काढून चोप दिला. चालक शिकत असल्याचे कळताच जमाव आणखीनच उग्रहोत असल्याचे पाहुन दोघांना तातडीने म्हसावद आऊटपोस्टच्या पोलिसांनी ताब्यात घेत चौकीत आणले. यानंतर अपघातग्रस्त दुचाकी व कार पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर जखमी विजय महाजन व त्यांच्या पत्नी दर्शना यांना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.