Private Advt

दुचाकी अपघातात जवानाचा मृत्यू

पारोळा – टेहू येथिल सैन्य दलातील जवान नंदू संजय पाटील (वय ३०) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. ते सुटीवर घरी आले होते. त्यांच्या दुचाकीचा ९ रोजी रात्री अपघात झाला होता.उपचारादरम्यान त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.मंगळवारी जवानावर शासकीय इतमामात टेहू येथे दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

जवान नंदू पाटील हे दहा वर्षापासून सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते. २१६ बटालियनमध्ये ते सध्या जबलपूर येथे देशसेवा करत होते. ते ८ रोजी सुटीवर आपल्या मूळ गावी आले होते. ९ रोजी वाघरे (ता.पारोळा) येथे आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त जात होते. टेहू-वाघरे रस्त्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने, त्यांच्या दुचाकीला हुलकावणी दिली. त्यामुळे दुचाकीवरून पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादम्यान १२ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.