दुचाकीच्या भीषण धडकेत 3 ठार; 2 जण गंभीर जखमी!

0

जामनेर। जामनेर-बोदवड रस्त्यावरील सिद्धगड भवानी फाट्यानजीक झालेल्या दुचाकींच्या समोरासमोरील भीषण टक्करीमध्ये तिघांचा मृत्यू झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अर्जुन रामदास माळी(वय 32), प्रल्हाद शामराव माळी(वय 60) दोन्ही रा. टाकळी तर किसन चिमा शिंदे (वय 35) मु.रा.नांदगाव, ह.मु.बोदवड असे मयत झालेल्यांची नावे आहेत. तर मंजुळाबाई प्रल्हाद माळी(वय 55) रा. टाकळी व जयदेव वासुदेव किटे(वय 38) रा.बोदवड कोल्हाडी असे दोघे जण अपघातात गंभीर जखमी झाले. बहादरपूर(मध्यप्रदेश) येथून लग्न आटोपून जामनेरकडे बोदवडमार्गे एम 19 सीएन 9476 या दुचाकीवरुन अर्जुन रामदास माळी, प्रल्हाद शामराव माळी व मंजुळाबाई प्रल्हाद माळी असे तिघे जण टाकळी ता.जामनेरकडे येत होते. तर एमएच28-यु 7599 या दुचाकीवरुन किसन चिमा शिंदे व जयदेव वासुदेव किटे हे दोन्ही जण जामनेरहून बोदवडकडे जात होते.