दुचाकीची महिलेला जोरदार धडक

0

जळगाव।  नशिराबाद येथे सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास रिक्षातून उतरणार्‍या अपंग महिलेला भुसावळकडून येणार्‍या मोटारसायलने जोरदार धडक दिली. त्यात महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनसगाव येथील दुर्गा अशोक नरवाडे (वय 30) या सोमवारी रिक्षाने नशिराबाद येथे आल्या होत्या.

दुपारी 4 वाजेच्या सुमारास रिक्षातून उतरत असताना भुसावळकडून येणार्‍या मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दुर्गा नरवाडे या लांब फेकल्या गेल्या. अपघात झाल्यानंतर मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून पसार झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.