Private Advt

दुचाकीचा धक्का लागल्याने एकाला मारहाण

भुसावळ/जळगाव : शहरातील मेहरूण मधील मास्टर कॉलनी भागातील 44 वर्षीय व्यक्तीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून रंगपंचमी खेळणार्‍या 10 ते 12 मुलांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
कासीम अब्दुल रहिम खाटीक (44, रा.मास्टर कॉलनी, मदरसा, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 18 मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मेहरुण येथील महादेव मंदिराजवळ महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोरून दुचाकीने जात असताना त्याठिकाणी एकाला दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून रंगपंचमी खेळणार्‍या 10 ते 12 अनोळखी मुलांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत कासीम अब्दुल रहीम खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 10 ते 12 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.