दुकाने सुरू करण्याच्या परवानगीसह आर्थिक मदत करा

0

बोदवड तालुका नाभिक समाजाकडून तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी

बोदवड : नाभिक समाजबांधवांची सलून दुकाने लॉकडाऊनमुळे बंद असल्यामुळे दुकान भाडे, घरभाडे, वीज बिल भरणे कठीण जात असल्याने सोशल डिस्टन्स व नियम पाळून दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी तसेच नाभिक बांधवांसाठी दरमहा 10 हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी बोदवड तालुका नाभिक महामंडळाकडून तहसीलदार हेमंत पाटील यांना सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
सलून दुकाने सुरू झाल्यास पीपीई किट, मास्क व संरक्षण साहित्य पुरवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी नाभिक तालुकाध्यक्ष विवेक वखरे, दुकानदार संघटना अध्यक्ष अनिल कळमकर, प्रकाश बाभुलकर, संजय वाघ, योगेश वखरे, सचिव गणेश सोनोने उपस्थित होते. सोशल डिस्टन्सचे पालन करत मास्क बांधून निवेदन देण्यात आले.

Copy