दीपनगर केंद्रामध्ये पारंपारिक पद्धतीने होळी साजरी

0

भुसावळ । दीपनगर विद्युत केंद्रात होळी निमित्ताने महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे पारंपारिक बंजारा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील शामकामाता महिला मंडळ, नाईक नगर, ढाबा तांडा येथील कलाकारांनी आकर्षक अशा पारंपारिक वेशभूषेत होळी नृत्य सादर केली. त्यांनी लेंगी (काव्य प्रकार) च्या माध्यमातून बंजारा भाषेतील गीत सादर केली. आपल्या गीतातून त्यांनी भ्रूण हत्या, मुलगी बचाव-मुलगी पढाव, स्वच्छता अभियान, शिवाजी महाराज, गाडगेबाबा यांचा संदेश दिला. याप्रसंगी तहसिलदार मिनाक्षी राठोड, मुख्य अभियंता अभय हरणे, उपमुख्य अभियंता माधव कोठुळे आणि नितीन गगे उपस्थित होते.

बंजारा समाजाचे कार्यकर्ते जगन्नाथ जाधव, राजू चव्हाण, भोला राठोड आदी उपस्थित होते.संघटनेच्यावतीने केंद्रीय पदाधिकारी एम.डी. पाटील, डी.के. झांसकर उपस्थित होते. संध्याकाळी नवीन क्रीडा संकुलाच्या आवारात प्रतिकात्मक होळीचे दहन करण्यात आले. परिसरातील पाला पाचोळा, प्लास्टिक कचरा तसेच वाईट सवयी आणि व्यसन यांच्या पत्रकांची होळी करण्यात आली. सूत्रसंचलन चांगदेव हाके यांनी केले तर आभार अनंत जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय अमोदकर, सुनिल ठाकूर, सुनिल पेडवी, गणेश राठोड, संजय तायडे, राजू गीते, पंकज वाणी, शैला सावंत, जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार, प्रविण बुटे, एम.डी. थेरोकार, यशवंत सिरसाट, आर.पी. निकम यांनी परिश्रम घेतले.