दीपनगरासह निंभोरावासीयांचा मदतीचा हात

0

गेल्या दोन आढवड्यापासून निरंतर भोजनाची व्यवस्था

दीपनगर : महामार्गावर पायी चालत जाणार्‍या परप्रांतीयांना दीपनगर येथील 660 नवीन प्रकल्पा समोर तसेच हॉटेल त्रिमूर्तीजवळ गेल्या दोन आढवड्यापासून निरंतर भोजनदान केले जात आहे. त्याच प्रमाणे औषधे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चप्पला बुटे आदींची सोय या सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्यातर्फे केली जात आहे.

यांचे उपक्रमासाठी लाभले सहकार्य
660 प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी स्वखर्चाने भोजनाचे बंद पाकीटचे वाटप करीत आहे तर 500 मेगावॅट प्रकल्पातील मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्यामार्फत ही भोजनाची व्यवस्था केली जात आहे. त्याच प्रमाणे येथील सामाजिक संघटना रोटरी क्लब, विश्वरत्न महिला बचतगट, वंचित बहुजन कंत्राटदार संघटना, स्थानिक सोपान चौधर व मित्र मंडळ वारसा समाजसेवेचा, सुरक्षा विभाग, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, एसईए, मागासवर्गीय कर्मचारी संघटना, ड्रायव्हर-क्लिनर संघटना गणपती मंडळ, भाग्यश्री चौथे, प्रीतम दीक्षित, चांदणी गार्डन मित्र मंडळ ,व दीपनगर मधील सर्व अधिकारी, अभियंते कर्मचारी व कंत्राटदार यांनी या कामात भरघोस प्रतिसाद दिला कंत्राटदार संघटना यांच्य तर्फे ही भोजनदान केले जात आहे. येथील राजेंद्र निकम, यशवंत शिरसाठ, कंत्राटदार संघटनेचे प्रकाश सरदार, फिरोज पठाण यांच्यासह दीपनगर, निंभोरा येथील युवक परश्रम घेत आहेत.

Copy