दीपनगरातील सुपरक्रिटीकल प्रकल्पात स्थानिक रोजगार व कंत्राटही

0

व्यवस्थापकीय संचालक थंगपंडियन : जून 2022 अखेर प्रकल्प होणार पूर्ण

भुसावळ : दीपनगरातील सुपरक्रिटीकल प्रकल्प 660 मेगावॅटच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून शनिवारी व्यवस्थापकीय संचालक थंगपंडियन यांनी प्रकल्पाला भेट देत अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली. याप्रसंगी हा प्रकल्प जून 2022 अखेर पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले की, वर्षभराच्या आत गटारींची कामे पूर्ण केली जाणार आहेत शिवाय स्थापत्य विभागाची कामे पूर्ण केली जातील.

प्रकल्पात स्थानिकांच्या हाताला रोजगार
थंगपंडियन प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या प्रकल्पात जास्तीत जास्त स्थानिक कंत्राटदार व मजुरांना रोजगाराची संधी देण्यात येणार असून त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचनाही करण्यात आल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, प्रकल्पातील बॉयलर कामाला सुरुवात झाली असून सीएचपी या विभागांच्या कामाला सुरूवात झाली असून वॉटर ट्रिटमेंट प्लॅन, ईटीपी या प्रकल्पांच्या कामांनाही लवकरच सुरूवात होणार आहे.

यांची होती उपस्थिती
मुख्य अभियंता अनंत देवतारे, मुख्य अभियंता विवेक रोकडे, अधीक्षक अभियंता महाजन, मुख्य अभियंता पीएनसी खट्यारे, उपमुख्य अभियंता मुंडे, उपमुख्य अभियंता इंगळे आदींची उपस्थिती होती.